Supreme Court seeks relief from Shiv Sena MLA Pratap Saranaik in money laundering case
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि अंमलबजावणी संचालनालय

प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) परदेशातून आल्यावर नियमांनुसार क्वारंटाईन राहिले होते. पंरुतु त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे ईडीने पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉंड्रिंग केल्याप्रकरणी कारवाई सुरु असल्याचे समजते आहेत

ठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik)  यांच्या घरी ईडीने (ED ) छापा टाकला होता. अंमलबजावणी संचानालयानं (ईडी) प्रताप सरनाईक यांच्या घरासह त्यांच्या दोन मुलांच्या घरे, कार्यालयासह १० मालमत्तांवर छापा टाकला होता. दरम्यान विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यातही घेतले होते. तब्बल पाच ते सहा तासांच्या चौकशीनंतर (interrogation) त्यांना सोडण्यात आले होते. ईडीने केलेल्या कारवाईच्या वेळी प्रताप सरनाईक हे परदेश दौऱ्यावर होते.

प्रताप सरनाईक परदेशातून आल्यावर नियमांनुसार क्वारंटाईन राहिले होते. पंरुतु त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे ईडीने पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे आदेश (ED issued summons)  दिले आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉंड्रिंग केल्याप्रकरणी कारवाई सुरु असल्याचे समजते आहेत. आमदार प्रताप सरनाईक हे ईडीच्या चौकशीला समोरे जाण्यासाठी तयार झाले आहेत. ते गुरुवारी त्यांचा मुलगा विहंग यांच्यासह ईडीच्या कार्यालयात चौकशीला उपस्थित राहणार आहेत.

ईडीने सरनाईकांना चौथ्यांदा समन्स बजावले होते. तरीही ते चौकशीसाठी हजर राहिले नाही. विहंग यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे चौकशीला हजर पुन्हा हजर राहता आले नाही. परंतु गुरुवारी ते ईडीच्या चौकशीला हजर राहणार आहेत. टॉप्सग्रुपमध्ये आर्थिक उलाढाल झाल्या प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.