vishwajeet kadam

केंद्रातील भाजप सरकार ही आंधळी आणि बहिरी सरकार(bjp government is bind and deaf) आहे. त्यामुळे त्यांना शेतकरी आणि सामान्य जनतेचे हाल दिसत नाहीत, अशी कडवट टीका महाराष्ट्राचे सामाजिक आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम(vishwajeet kadam) यांनी केली आहे.

ठाणे : केंद्रातील भाजप सरकार ही आंधळी आणि बहिरी सरकार(bjp government is bind and deaf) आहे. त्यामुळे त्यांना शेतकरी आणि सामान्य जनतेचे हाल दिसत नाहीत, अशी कडवट टीका महाराष्ट्राचे सामाजिक आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम(vishwajeet kadam) यांनी केली आहे. गेले पन्नास दिवस केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असतानाही हे सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे ? असा सवाल यावेळी कदम यांनी केला.

या कायद्यावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणून चार सदस्य समिती स्थापन केल्याने या सरकारची नाचक्की झाल्याचे देखील कदम यांनी सांगितले. विश्वजित कदम हे मंगळवारी ठाण्यात जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे सात्वन करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांनी चर्चादेखील केली. यावेळी त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण,सरचिटणीस सचिन शिंदे,माजी अध्यक्ष अनिल साळवी,प्रभाग समिती सभापती दिपाली भगत आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रातील भाजप सरकार हे जुलमी सरकार असून या कायद्यामधून उगचाच शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. तसेच सुप्रीम कडक शब्दात सुनावले असून असल्याने या सरकारने हा कायदा रद्द करावा किंवा या कायद्यामुळे सुधारणा करावी अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली आहे. तसेच काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत आहे. आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणो उभे आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ज्या पध्दतीने निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातील हा कायदा बदलावा, त्याला स्थगिती द्यावी,अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे,जो पर्यंत भाजप प्रणित केंद्र सरकार हा कायदा बदलत नाही तो पर्यंत कॉंग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत राहील असा इशारा सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिला.

राज्यात बर्ड फ्ल्यूची साथ सुरु असून राज्यातील काही जिल्ह्यात त्याची लक्षणे आढळली आहेत. मात्र याचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आहे. तसेच राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारे यांनी बैठक घेऊन जिल्हा स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना खबदारीच्या सुचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. दुर्देवाने हा आजार जास्त पसरू नये यासाठी कठोर पावले उचलावी लागली तरी त्यासाठी राज्य शासन तयार आहे असे मत देखील कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

केंद्र सरकारने शेतकरी आणि जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. गेल्या वर्षभरत देशाची आणि राज्याची प्रचंड आर्थिक हानी झाली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हे राज्य पुन्हा एकदा उभारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.