रिसोर्स बँकेतील शेतक-यांशी कृषीमंत्री दादासाहेब भुसे साधणार संवाद ; व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून शेतक-यांना मार्गदर्शन

ठाणे : कृषी विस्तार कार्यामध्ये शेतक-यांनी नेहमी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व शास्त्रज्ञ संवाद साधत असतात परंतु ज्या शेतक-यांनी उत्तम प्रकारे शेती करून समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा शेतक-यांना जर विस्तार कार्यामध्ये सहभागी करून घेतले तर कृषी विस्ताराचे कार्य अधिक प्रभावी होऊ शकेल या उद्देशाने कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेवरून राज्यात शेतक-यांची रिसोर्स बँक स्थापन केलेली आहे

ठाणे : कृषी विस्तार कार्यामध्ये शेतक-यांनी नेहमी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व शास्त्रज्ञ संवाद साधत असतात परंतु ज्या शेतक-यांनी उत्तम प्रकारे शेती करून समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा शेतक-यांना जर विस्तार कार्यामध्ये सहभागी करून घेतले तर कृषी विस्ताराचे कार्य अधिक प्रभावी होऊ शकेल या उद्देशाने कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेवरून राज्यात शेतक-यांची रिसोर्स बँक स्थापन केलेली आहे. राज्यातील सर्व जिल्हयातील रिसोर्स बँकेतील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांचे जिल्हानिहाय व्हाटस अॅप ग्रुप तयार करण्यात आलेले असून याद्वारे शेतक-यांमध्ये तंत्रज्ञान देवाण घेवाण व मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळेच रिसोर्स बँकेतील सर्व शेतक-यांशी कृषीमंत्री दादाजी भुसे संवाद साधणार आहेत. दि ७ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३ वाजता कृषी विभागाच्या युटयूब चॅनेलवर क्लिक करून जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्यातील शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून सद्यस्थितीत काही शेतकरी अभिनव उपक्रम अथवा सुधारीत पध्दत वापरून उत्पादन व उत्पन्न वाढ करत आहेत. अशा शेतक-यांचा आदर्श इतर शेतक-यांपुढे ठेवणे, कृषी विभागाने या अभिनव उपक्रमाचा उपयोग इतर शेतक-यांना होण्याच्या दृष्टीने विस्तार कार्य हाती घेणे व अशा अभिनव उपक्रमशील शेतक-यांबरेाबरच विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देणे या उद्देशाने राज्यातील शेतक-यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणा-या एकूण ३६०६ शेतकरी बंधू भगिनींची रिसोर्स बँक यादीचे अनावरण कृषी मंत्रयच्या हस्ते ५ जूलै २०२० रोजी यवतमाळ जिल्हयातील खैरगाव येथे करण्यात आले आहे याबरोबरच विविध कृषी पुरस्कार विजेते व पीक स्पर्धा विजेत्या शेतक-यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सद्यस्थितीत एकूण ५००९ शेतक-यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे.

जिल्हा आणि तालुका स्तरावर व्हॉटसअॅप ग्रुप

क़षी विभागातील विविध योजनांची प्रचार व प्रसिध्दी तसेच विस्तार कार्य प्रभावी करण्यासाठी प्रत्येक कृषी सहाययक यांनी त्यांच्या गावातील शेतक-यांच्या व्हॉटसअप ग्रुप तयार करून त्यात रिसोर्स बँकेतील शेतक-यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामधून विविध पिकांचे तंत्रज्ञान वाणांची निवड खतांची मात्रा किड रोग प्रादुर्भाव व नियंत्रण एकात्मिक कीड व्यवस्थापन कृषी विभागाचा योजना व शेतमालाचे विपणन इत्यादी गोष्टीबाबत मार्गदर्शन करण्यात यावे अशाच प्रकारचा व्हॉटसअप ग्रुप देखील तालुका स्तरावर स्थापन करण्यात येत आहे याशिवाय राज्यातील सर्व जिल्हयातील रिसोर्स बँकेतील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांचे जिल्हानिहाय व्हाटस अॅप ग्रुप तयार करण्यात आलेले असून याद्वारे शेतक-यांमध्ये तंत्रज्ञान देवाणघोण व मार्गदर्शन करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अंकुश माने यांनी दिली.