air quality checking device

महिनाभर चाललेल्या वायू प्रदूषण पाहणीचा अहवाल(air quality report) डिसेंबर २०२० मध्ये वातावरण फाऊंडेशनने(vatavaran foundation) प्रकाशित केला होता. त्या अहवालानुसार सकाळच्या काही तासांमध्ये पीएम २.५ या वायू प्रदूषकाचं प्रमाण हवेत सर्वाधिक होतं. याशिवाय खारघर(kharghar )-तळोजा(taloja)-पनवेल(panvel) परिसरातील रहिवाशांना दिवसातील १७ तास प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागतो, असं अहवाल सांगतो.

    खारघर: वातावरण फाऊंडेशन(vatavaran foundation) नियमितपणे तळोजा एमआयडीसीतील(taloja MIDC) वायू प्रदूषणाचा खारघर(kharghar), तळोजा(taloja), पनवेल(panvel) शहर व कळंबोली येथील नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा मांडत आले आहे. वातावरण फाऊंडेशनने ८ मार्च २०२१ रोजी मिळवलेल्या माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास कळंबोली भागात परिसरातील हवेची गुणवत्ता सतत तपासणारी यंत्रणा बसविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून ना हरकत दाखला मिळाल्याचे उत्तर प्रदूषण नियामक मंडळाकडून देण्यात आले आहे.

    प्रदूषण नियंत्रण मंडळाने खारघर व तळोजा एमआयडीसी परिसरात हवेची गुणवत्ता तपासणी व नोंदणी करणारी यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान तळोजा एमआयडीसी परिसरातील वायू प्रदूषणाबाबतच्या तक्रारींचा पाठपुरावा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे करावा, असेही पत्रात म्हटले आहे.

    या भागातील प्रदूषण कमी करण्यासाठीचं हे पहिलं पाऊल असल्याचे मत वातावरण फाऊंडेशनने व्यक्त केले आहे. महिनाभर चाललेल्या वायू प्रदूषण पाहणीचा अहवाल डिसेंबर २०२० मध्ये वातावरण फाऊंडेशनने प्रकाशित केला होता. त्या अहवालानुसार सकाळच्या काही तासांत पीएम २.५ या वायू प्रदूषकाचं प्रमाण हवेत सर्वाधिक होतं. याशिवाय खारघर-तळोजा-पनवेल परिसरातील रहिवाशांना दिवसातील १७ तास प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागतो, असं अहवाल सांगतो.

    जानेवारी २०२१ मध्ये वातावरण फाऊंडेशनने खारघर येथे दाट वाहतुकीच्या चौकात फुफ्फुसांची मोठी प्रतिकृती बसवली होती. ती पांढऱ्या रंगाची प्रतिकृती दहा दिवसांत पूर्णपणे काळी पडली. अनेक लोकनियुक्त प्रतिनिधींनी त्याला भेट दिली. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी त्याची पाहणी करून वायू प्रदूषणाचे परिणाम जाणून घेतले.

    याबाबतचा सविस्तर अहवाल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांना पाठवण्यात आला आहे. तळोजा, खारघर आणि पनवेल परिसरात हवेची गुणवत्ता सातत्याने तपासणारी यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांनाही हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी उपलब्ध व्हावी व स्वच्छ हवा योजना निर्मितीसाठी मदत म्हणून हा अहवाल देण्यात आला आहे.