tmc

मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातील सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. तसेच ठाणेकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस या शुभ दिवशी ठाण्यातील सर्व दुकाने उद्यापासून खुली करण्यात येणार आहेत. या निर्णयावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

ठाणे : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. परंतु राज्यातील काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मुंबई आणि ठाण्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच रिकव्हरी रेटमध्ये सुद्धा कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातील सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. तसेच ठाणेकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस, या शुभ दिवशी ठाण्यातील सर्व दुकाने उद्यापासून खुली करण्यात येणार आहेत. या निर्णयावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 

ठाण्यात जूनमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कोरोनावर आळा घालण्यासाठी दहा दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी २ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. त्याचबरोबर कंटेन्मेट झोन क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. परंतु ऑगस्ट महिन्यात रूग्णांच्या संख्येत घट झाल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.   

सम-विषम फॉर्म्युल्यानुसार ठाणे शहरातील जी आस्थापने सुरु होती, ती १५ ऑगस्टपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरु ठेवण्यात येतील. तसेच मॉल्स, मार्केट, जिम आणि स्वीमिंग पूलबाबत आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.