Allegation of stealing Mangalsutra of a female patient at covid Center in Dombivali, however, was opposed by the agency

सागर शंकर चव्हाण याने त्याच्या आईचे सोन्याचे मंगळसूत्र डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या मे.ओम साई केअर आरोग्य प्रा. लि. एजन्सीच्या स्टाफने चोरल्याचा आरोप केला आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार सागर चव्हाण यांची आई सदर कोविड सेंटर येथे कोरोना आजारावर उपचार घेत होती.

डोंबिवली : कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी केडीएमसीने एका एजन्सीला कोविड सेंटर (stealing  in covid Center) सुरु करण्यास दिले. १ तारखेला रात्रीच्या सुमारास डोंबिवलीतल्या जिमखान्यातील कोविड सेंटरमध्ये एका कोरोना बाधित महिलेच्या ( female patient)  गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला (stealing Mangalsutra) गेल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या मुलाने टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. मात्र कोविड सेंटर चालविणाऱ्या एजन्सीने या आरोपाचा खंडन केले असून रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज पोलिसांना दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर शंकर चव्हाण याने त्याच्या आईचे सोन्याचे मंगळसूत्र डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या मे.ओम साई केअर आरोग्य प्रा. लि. एजन्सीच्या स्टाफने चोरल्याचा आरोप केला आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार सागर चव्हाण यांची आई सदर कोविड सेंटर येथे कोरोना आजारावर उपचार घेत होती. उपचार सुरु असताना १ तारखेला रात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याच्या आईच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले. मात्र मे.ओम साई केअर आरोग्य प्रा. लि. एजन्सीचे कार्यकारी अधिकारी डॉ. साहिल यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना रुग्णाकडील मौल्यवान वस्तू रुग्णालयाच्या आत नेण्यास मनाई असते. तशी नोटीस लावली असल्याचे सांगितले जाते.

रुग्णाला रुग्णालयाच्या आत मोबाईलही घेऊन जाण्यास परवानगी नाही. या प्रकारात तक्रार दाखल केलेल्या तरुणाच्या आईकडे सोन्याचे दागिने नव्हते. आमच्याकडे रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असून सर्व फुटेज पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी या प्रकारावर सखोल चौकशी करून तपास करावा असे सांगितले. तर प्रशासकिय हॉस्पीटल मॅनेजमेंटच्या रोहिणी लोकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, जिमखाना येथे २१ ऑगस्टला कोविड सेंटर सुरु झाले सेंटर सुरु झाल्यापासून आतापर्यत ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. मात्र अद्याप अशा प्रकारचा कुठलाही प्रकार कोविड सेंटर मध्ये घडला नाही. कोविड सेंटर मध्ये मौल्यवान वस्तू आणि सोन्याचे दागिने आत नेण्यास परवानगी नाही. अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिल्या जातात.