अंबाडी ग्रामपंचायतीचा गलस्थान कारभार; ग्रामपंचायत विसर्जित करण्याची मागणी

भिवंडी - भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी तीर्थ क्षेत्र लगत असलेली अंबाडी ग्रामपंचायतमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार गाजताना दिसत आहेत. अंबाडी नाका येथे अनधिकृत बांधकाम, दुर्गंधीयुक्त भाजी

 भिवंडी –  भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी तीर्थ क्षेत्र लगत असलेली अंबाडी ग्रामपंचायतमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार गाजताना दिसत आहेत. अंबाडी नाका येथे अनधिकृत बांधकाम, दुर्गंधीयुक्त भाजी मार्केट येथे रस्त्यावर अनधिकृत टपर्या  उभारून काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी हप्ते वसूल करत आहेत. लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या भाजी मार्केटमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरू असताना सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन केले जात नसून रोजचीच दळणवळणाची खूपच गर्दी असते. त्यातच आजुबाजूच्या बिल्डिंग लगत हातगाडी वाल्यांनी  बिल्डिंगच्या समोर शेड काढून अनधिकृत बांधकाम केलेले आहे. त्याच्यामुळे वाहतुकीत अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पुढाऱ्यांनी रस्ताच हडप करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

ग्रामपंचायत कोणत्या पद्धतीने काम करते हेच काही कळत नाही रस्त्यावर अनधिकृत बांधकाम होऊन सुद्धा ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. अशा अनेक कारणाने या ग्रामपंचायतीचा मनमानी कारभारामुळे तसेच ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव हे या सर्व बाबींकडे लक्ष देत नसल्याने ही ग्रामपंचायत विसर्जित करा. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केल्याचे समजते