अंबरनाथमध्ये २३ जून ते ३० जून या काळात लॉकडाऊन

अंबरनाथ : कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन अनलॉक केल्यानंतर अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने १५ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. त्यापाठोपाठ आता

 अंबरनाथ : कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन अनलॉक केल्यानंतर अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने १५ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. त्यापाठोपाठ आता अंबरनाथमध्येही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये उद्यापासून लॉकडाऊन सुरु होणार आहे आणि ३० जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत. असा आदेश अंबरनाथ नगर परिषदेकडून जाहीर करण्यात आला आहे.

अंबरनाथ नगर परिषद हद्दीक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे. नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार २३ जून ते ३० जूनपर्यंत शहरात लॉकडाऊन असेल. या काळात दवाखाने, औषधालये दूध, फळे,  भाज्या यांची सेवा सुरु राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेने म्हटले आहे.