अंबरनाथमध्ये कोरोना रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णावाहिकेला घंटागाडीची धडक

  • रुग्णवाहिका बदलापूर येथील कोरोना रुग्णाला उल्हासनगर मधील रुग्णालयात उपचारास घेऊन जात होती. परंतु विरुद्ध दिेशेने येणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका आणि घंटा गाडीचे नुकसान झाले आहे. तसेच दोन्ही चालकांना दुखापत झाली आहे. सुदैवाने कोरोना रुग्णाला कोणतीही इजा झालेली नाही.

अंबरनाथ – अंबरनाथमध्ये कोरोना रुग्णाला रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेचा आणि कचरा विस्थापन करणाऱ्या घंटा गाडीची जोरदार धडक झाली आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेचा चालक जखमी झाला आहे. 

रुग्णवाहिका बदलापूर येथील कोरोना रुग्णाला उल्हासनगर मधील रुग्णालयात उपचारास घेऊन जात होती. परंतु विरुद्ध दिेशेने येणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका आणि घंटा गाडीचे नुकसान झाले आहे. तसेच दोन्ही चालकांना दुखापत झाली आहे. सुदैवाने कोरोना रुग्णाला कोणतीही इजा झालेली नाही. 

घटनेची माहिती कळताच अंबरनाथ शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना जवळील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. याप्रकरणी घंटागाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती वरिंष्ठांनी दिली आहे.