वालधुनी पुलाची रंगरंगोटी
वालधुनी पुलाची रंगरंगोटी

सामाजिक बांधिलकी जपत कल्याण वालधूनी रेल्वे उड्डाणपूलाची रंगरंगोटी केली आहे. बिना ओम बेनाम असे या महिलेचे नाव आहे. तिने आत्तार्पयत स्वखर्चातून २७ लाख खर्च करून स्मशानभूमी, शाळा, अनाथालये यांची रंगरंगोटी केली आहे. गेल्या आठ वर्षापासून त्या हेच काम करीत आहे.

कल्याण (Kalyan).  सामाजिक बांधिलकी जपत कल्याण वालधूनी रेल्वे उड्डाणपूलाची रंगरंगोटी केली आहे. बिना ओम बेनाम असे या महिलेचे नाव आहे. तिने आत्तार्पयत स्वखर्चातून २७ लाख खर्च करून स्मशानभूमी, शाळा, अनाथालये यांची रंगरंगोटी केली आहे. गेल्या आठ वर्षापासून त्या हेच काम करीत आहे.

गेल्या तीन दिवसापासून कल्याण वालधूनी रेल्वे पूलाचे संरक्षक कठडयांची रंगरंगोटीचे काम सुरु आहे. गुलाबी आणि लाल रंगाने रंगरंगोटीचे काम सुरु होते. एक वयोवृद्ध महिलेसह तिचे दोन सहकारी हे काम करीत आहेत. सुरुवातीला वाटले की त्यांना रंगरंगोटीचे कंत्राट दिले गेले असावे. जेव्हा महिलेकडे चौकशी केली तेव्हा वेगळी बाब समोर आली. उल्हासनगरातील ओटी सेक्शन परिसरात राहणारी बिना ओम बेनाम ही महिला इतक्या मोठय़ा पूलाची स्वखर्चातून रंगरंगोटी करीत आहे. बेनाम ह्या त्यांंचे पती कुमार वाधवा यांच्यासोबत गेली २५ वर्षे आमेरिकेत वास्तव्याला होत्या. त्यांना रंगरंगोटी करण्याची आवड आहे. त्यांनी आमेरिकेतही रंगरंगोटीचे काम केले आहे. त्याठिकाणी त्यांना चारशे डॉलर मोबदला मिळत होता. त्यांंच्या एका पायाला डबल फॅक्चर असल्याने त्या त्यांच्या पतीसोबत भारतात आल्या आहेत. त्यांना एक मुलगा आहे. मात्र तो आमेरीकेत वास्तव्याला आहे.

गेल्या आठ वर्षापासून त्या उल्हासनगरात राहत आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यावेळी त्यांना त्यांच्या पतिने काही रक्कम भेट दिली होती. ती रक्कम २८ लाख रुपये होती. त्यांनी ती रक्कम बँकेत ठेवली. त्या रक्कमेतून आत्तार्पयत २७ लाख रुपयांची रंगरंगोटी करीत त्यांनी सामाजिक बांधिलकी चा वसा सुरू ठेवला आहे. वालधुनी रेल्वे पुलाच्या संरक्षण कठड्यांंना गुलाबी व लाल रंग दिल्याने पूलाचे रुपडे पालटले आहे. बेनाम यांनी पतीचा वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी वालधूनी रेल्वे पुलाची रंगरंगोटी केली आहे. त्यांनी स्मशानभूमी, अनाथालये, शाळा रंगविल्या आहेत. पुलाला गुलाबी व लाल रंग दिल्याने वालधुनी रेल्वे पुलाने कात टाकल्याने पूलाचे रुपडे पालटले आहे.