अंघोळीची गोळी या संस्थेतर्फे झाड या विषयावर साहीत्य पाठविण्याचे आवाहन

कल्याण : अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने झाड हा ई- काव्यसंग्रह लवकरच प्रसिद्ध होणार आहे. झाडं या विषयांवर केलेल्या रचना प्रामुख्याने कविता आणि चारोळी पाठवण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात

 कल्याण : अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने झाड हा ई- काव्यसंग्रह लवकरच प्रसिद्ध होणार आहे. झाडं या विषयांवर केलेल्या रचना प्रामुख्याने कविता आणि चारोळी पाठवण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. साहित्य ८०८०१७१४३० या नंबरवर व्हॉट्स अॅपद्वारे पाठवता येईल. सोबत आपले नाव, आणि पत्ता पाठवणे गरजेचे आहे. सदर ई- काव्य संग्रह प्रामुख्याने झाडांविषयी लोकांमध्ये जनजागृती आणि आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या कविता, चारोळी पहिले कुठे प्रकाशित झाल्या असल्या तरी स्वीकारल्या जातील. ३० जुन २०२० पर्यंत साहित्य स्वीकारले जाईल, असे अविनाश पाटील यांनी सांगितले आहे. आपण पाठवलेले साहित्य वेळोवेळी संस्थेच्या सर्व सोशल मीडिया माध्यमावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.