डहाणू तालुक्यात आढळला आणखी १ कोरोना विषाणू बाधित रुग्ण

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या कासा इथं राहणाऱ्या एका ४६ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता त्याच्या रिपोर्ट

 पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या कासा इथं राहणाऱ्या एका ४६ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता त्याच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीनं दिल्लीहुन प्रवास केला आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत आज दुपार पर्यंत मिळालेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात ४०५ कोव्हीड-१९ चे रुग्ण आहेत. त्यापैकी १७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर बऱ्या झालेल्या २१९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

पालघर तालुका – २१ ( २ मृत्यू )

डहाणू तालुका – १२ 

वाडा तालुका – ३

वसई ग्रामीण – १४ ( मृत्यू ) 

वसई विरार महानगरपालिका क्षेत्र – ३५५ ( १४ मृत्यू )