मुरबाडमध्ये हाणामारीतील जखमी निघाला कोरोनाग्रस्त – रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस चिंतेत

मुरबाड: मुरबाडमध्ये बुधवारी एकाच दिवशी कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर आज आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.मारहाणीत जखमी झालेल्या एकाला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी आणले

मुरबाड: मुरबाडमध्ये बुधवारी एकाच दिवशी कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर आज आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.मारहाणीत जखमी झालेल्या एकाला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी आणले होते.त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याची बाब आज समोर आल्याने त्याच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील म्हाडस येथे दोन गटात जबर हाणामारीची घटना घडली आहे. यातील जखमींवर मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील एकाचा संशय आल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. यात तो पॉझिटिव्ह आढळल्याने सध्या एकच खळबळ माजली आहे.या जखमी रुग्णाला दवाखान्यात आणणारे, त्याच्यावर उपचार करणारे,तसेच या गुन्ह्यात तपास करणारे पोलीस यामुळे चिंतेत आहेत.