अॅन्टीजेन टेस्टद्वारे अवघ्या ३० मिनिटांत येणार कोरोना रिपोर्ट – कल्याण डोंबिवली पालिका करणार १० हजार किट्सची खरेदी

कल्याण : महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका आता बाधित रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टची अॅन्टीजेन टेस्ट करणार असून

 कल्याण : महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका आता बाधित रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टची अॅन्टीजेन टेस्ट करणार असून महापालिकेतर्फे सद्यस्थितीत १० हजार टेस्ट किट्स खरेदी करण्यात येत असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त किट्स खरेदी करण्यात येणार आहेत. या टेस्टचा रिपोर्ट अवघ्या ३० मिनिटांत येणार असल्याने याचा फायदा हा कोरोना रुग्णाच्या निकट सहवासितांना आणि इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना होणार आहे.

ही टेस्ट आय.सी.एम.आर. मान्यता प्राप्त असून या कीटद्वारे कोव्हीड आजाराचे निदान करता येईल. या टेस्टचा उपयोग कटेंटमेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करून फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या तसेच हायरिस्क व्यक्तींच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या ह्र्दयविकार फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड विकार, मधुमेह तसेच रक्तदाब आदी विकास असलेल्या त्याचप्रमाणे केमोथेरपी, एच. आय. व्ही. बाधित, अवयव प्रत्यारोपण किंवा वयोवृद्ध व्यक्तींवर तसेच गरोदर महिलांवर तातडीने उपचारासाठी होणार आहे. ही टेस्ट अगदी माफक किमतीत उपलब्ध होणार असूनही टेस्ट चालू झाल्यावर पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल तत्काळ प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार त्वरित सुरु करणे शक्य होणार आहे.