एपीएमसीमध्ये येणाऱ्या गाड्यांचे निर्जंतुकीकरण आणि लोकांची तपासणी करण्याची मयुर पाटील यांची मागणी

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मालासह जीवनावश्यक वस्तूंची आवक, खरेदी विक्री केली जाते. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मयुर सुरेश पाटील

कल्याण :  कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मालासह जीवनावश्यक वस्तूंची आवक, खरेदी विक्री केली जाते. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता कृषी
उत्पन्न बाजार समिती सदस्य मयुर सुरेश पाटील यांनी एपीएमसीत येणाऱ्या मालवाहतूक गाडयांसाठी निर्जंतुकीकरण आणि खरेदी विक्रीसाठी येणाऱ्यांची थर्मल स्कॅनिंग, पल्स ऑक्सिमीटर तपासणी करून प्रवेश देण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली आहे.                
 
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी माल, जीवनावश्यक वस्तुूखरेदी विक्रीसाठी व्यापारी, वाहतूक व्यासायिक, अशी अनेकांची वर्दळ असते. अशातच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना कोरानाची लागण झाल्याचे समजते. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी बाजार समित मध्ये येणाऱ्या मालाच्या गाड्याचे साँनिटायझर करून आत सोडणे, तसेच येणाऱ्या लोकांचे थर्मल स्कॅनिंग, पल्स ऑक्सिमीटर तापसणी, तोंडाला मास्क लावणे आदी बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी तातडीने करण्यात येण्याबाबत, बाजार समिती क्षेत्रात विविध ठिकाणी हॅन्ड वॉश बेसिन बसविण्यात याव्यात.  मार्केट परिसरातील, स्वच्छता, आठवड्यात एकदा जंतुनाशक फावरणी करणे, जेणेकरून कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळता येईल. तातडीने या विषयाची प्रशासनाने अंमलबजावणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मयूर पाटील यांनी याबाबत प्रशासनाला पत्र देऊन हा तातडीचा विषय आज कृषी उत्पन्न बाजार समिती बैठकीत मंजुर करून घेतला आहे. यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी निश्चितच मदत होईल.