भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी हरिश्चंद्र भोईर यांची नियुक्ती

भिवंडी : भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तथा भाजप ठाणे – पालघर विभागीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष हरिश्चंद्र भोईर यांची भाजप  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.त्यांच्या या नियुक्तीचे प्रदेश सचिव दयानंद चोरघे, विनोद ठाकरे, राजेंद्र भोईर,उद्योगपती प्रताप शेठ पाटील ,चंद्रकांत भोईर ,छत्रपती पाटील,सरपंच राजेंद्र मढवी, जगन पाटील ,लाडक्या पाटील, निलेश गुरव, प्रफुल्ल खंडागळे, नगरसेवक निलेश चौधरी, सुमित पाटील ,राम माळी, अरुण जाधव आदींसह भाजप वर्तुळातून स्वागत करण्यात येत आहे.हरिश्चंद्र भोईर हे खासदार कपिल पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जात आहेत.त्यांनी  गेल्या पाच वर्षांमध्ये विभागीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना ठाणे ,पालघर जिल्ह्यातील ओबीसी घटकातील कार्यकर्त्यांची नाळ भाजप पक्षासोबत जोडण्यात त्यांनी सक्रिय काम केले आहे.त्यांच्या या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन भाजप प्रदेश नेतृत्वाने हरिश्चंद्र भोईर यांना पदोन्नती देऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाच्या उपाध्यपदी नियुक्ती करून सन्मान केला आहे.