महाराष्ट्र राज्य मजूर जनरल कामगार युनियनच्या सचिव पदी संदीप मोरे यांची नियुक्ती

भिवंडी - भिवंडी युनिटचे अध्यक्ष व महाड पोलादपूर बौद्ध सेवा संघाचे उपाध्यक्ष भारत तांबे व कार्याध्यक्ष सुरेश म्हस्के यांच्या हस्ते कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेले संदीप मोरे

 भिवंडी – भिवंडी युनिटचे अध्यक्ष व महाड पोलादपूर बौद्ध सेवा संघाचे उपाध्यक्ष भारत तांबे व कार्याध्यक्ष सुरेश म्हस्के यांच्या हस्ते कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेले संदीप मोरे यांची  महाराष्ट्र राज्य मजूर जनरल कामगार युनियनच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संदीप मोरे यांनी समाजिक क्षेत्रात अनेक वर्ष चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहे व त्यांच्या प्रयत्नास भरघोस यशही प्राप्त झाले आहे. त्यांच्या एकंदरीत समाजिक कार्याचा आढावा घेऊन युनियनचे संस्थापक अध्यक्ष सागर थोरात व सचिव विजय गायकवाड यांच्या मान्यतेने भिवंडी युनिटचे अध्यक्ष भारत तांबे व कार्याध्यक्ष सुरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत संदीप मोरे यांची युनियन कार्यालयात नियुक्तीपत्र देऊन सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी संदीप मोरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .