मुरबाड तालुक्यातील मंजुर घरकुले रखडली, सभापतींचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे

मुरबाड पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यभार तरुण युवा कार्यकर्ता श्रीकांत धुमाळ यांनी स्विकारताच गोरगरीब,सर्वसामान्य नागरिकांच्या निवाऱ्याची व्यवस्था तात्काळ होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी या घरकुल योजनांचा पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका पत्राद्वारे वंचीत लाभार्थ्यांना त्वरीत लाभ देण्यासाठी विनंती केली आहे.

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आदिम आदिवासी व रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची घरकुले मंजुर झाली असतांनाही त्यांचा निधी प्राप्त नसल्याने ही घरकुले लालफितीत अडकली आहेत. त्यामुळे ही घरकुले पूर्ण करण्याबाबत तातडीने कारवाई करावी यासाठी मुरबाड पंचायत समिती सभापतींनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.

मुरबाड पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यभार तरुण युवा कार्यकर्ता श्रीकांत धुमाळ यांनी स्विकारताच गोरगरीब,सर्वसामान्य नागरिकांच्या निवाऱ्याची व्यवस्था तात्काळ  होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी या घरकुल योजनांचा पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका पत्राद्वारे वंचीत लाभार्थ्यांना त्वरीत लाभ देण्यासाठी विनंती केली आहे.

सन २०१९-२० वर्षांसाठी आदिम आवास योजनेत मुरबाड गटा साठी १६ घरकुलांचा लक्षांक मंजूर आहे तर रमाई आवास योजनेचाही याच वर्षांसाठी ८० घरकुलांचा लक्षांक मंजूर आहे.या बाबत संबधीत लक्षांका नुसार पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरी साठी ठाणे जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आलेले आहेत.

मात्र आज पर्यंत सदरच्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले नसल्याने त्यांना अद्याप घरकुला पासून वंचित रहावे लागले आहे.त्यामुळे पुढील स्तरावर कार्यवाही करण्याची विनंती सभापती श्रीकांत धुमाळ यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.