एप्रिलचे वेतन शिक्षक-शिक्षकेतरांच्या खात्यात जमा, भाजपा शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्याला यश

कल्याण : मुंबईसह राज्यातील शिक्षकांना एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी निधी कमी पडत होते. भाजपा शिक्षक आघाडीने याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून अखेर शासनाने निधी मंजूर केल्याने आज मुंबईतील

कल्याण : मुंबईसह राज्यातील शिक्षकांना एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी निधी कमी पडत होते. भाजपा शिक्षक आघाडीने याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून अखेर शासनाने निधी मंजूर केल्याने आज मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांचे एप्रिल महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा झाले असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले. 

शासनाने एप्रिल महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले होते. परंतु वेतन अधिक्षकांकडे वेतन अनुदान देण्यासाठी निधी कमी पडत होता. त्यामुळे एप्रिल चे वेतन कसे अदा करावे असा प्रश्न वेतन अधीक्षकांना पडला होता. याबाबत भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी २४ एप्रिल रोजी वित्त विभागाचे सचिव, शालेय शिक्षण सचिव,  शिक्षण आयुक्त व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालकांकडे मेल करून तातडीने वेतन अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाच्या अंतर्गत मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याचा समावेश होतो या जिल्ह्यांमध्ये एप्रिल च्या वेतनासाठी केवळ अर्धाच निधी उपलब्ध होता. शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन कसे होतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतन अधीक्षक कार्यालयांनी शाळांना एप्रिल महिन्याचे बिले सबमिट करायला सांगितले होते ते शाळांनी जमा पण केले होते. त्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने केली होती. अखेर माध्यमिक शिक्षण संचानालयाने वेतन अनुदान मंजूर झाल्याचे राज्यातील  शिक्षणाधिकारी, मुंबईतील तीनही शिक्षण निरीक्षक व वेतन अधीक्षकांना सूचना दिल्याने एप्रिल महिन्याचा वेतनाचा प्रश्न सुटला व आज प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा झाले असल्याचे मुंबई विभागाचे सहसंयोजक सचिन पांडे, विजय धनावडे, सुभाष अंभोरे, बयाजी घेरडे व संयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.