knives

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ही तरुणी घरी असताना तरुणाने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर तरुण हा या तरुणीचा मित्र असून, तिने त्याच्याबरोबर मैत्रीचे संबंध तोडले होते. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    मुंबई : एका तरुणाने प्रेम प्रकरणातून युवतीवर धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना वसईमध्येही उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई जखमी झाली आहे. तर हल्ल्यानंतर तरुणानेही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वालीव पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ही तरुणी घरी असताना तरुणाने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर तरुण हा या तरुणीचा मित्र असून, तिने त्याच्याबरोबर मैत्रीचे संबंध तोडले होते. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    तरुणाने तरुणीने चाकूने हल्ला केला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. त्याचबरोबर यावेळी मध्ये आलेल्या तरुणीच्या आईवरही चाकूने वार केले. सध्या तरुणी आणि तिच्या आईवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. तरुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.