रूग्णवाहिका मिळत नसल्याने चिमुरड्यासह गर्भवती महिलेची कळवा ते कल्य़ाण रेल्वे रुळावरुन पायपीट

कल्याण - आठ महिन्यांची एका गर्भवती असणाऱ्या कल्याणातील एका महिलेला ३ वर्षांच्या चिमुरड्यासह कळवा ते कल्याण हे अंतर रेल्वे ट्रॅकवरून पायपीट करीत यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

 कल्याण – आठ महिन्यांची एका गर्भवती असणाऱ्या कल्याणातील एका महिलेला ३ वर्षांच्या चिमुरड्यासह कळवा ते कल्याण हे अंतर रेल्वे ट्रॅकवरून पायपीट करीत यावे लागल्याचा  धक्कादायक प्रकार समोर आला आसल्याने  सरकारी रुग्णालयातील अजब गजब कारभारामुळे  पायपीट करण्याची वेळ या गर्भवती महिलेवर आल्याने सरकारी  आरोग्य यंत्रणेतील सावाळा गोधंळ कारभार कधी सुरळीत होणार असे या मनाला हेलवुन टाकणार्या  घटनेतून चित्र दिसत  आहे.

कल्याणातील कचोरे  परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे भागात राहणारी शबा शेख नावाची महिला आठ महिन्यांची गर्भवती महिला प्रसूतीसाठी ती सुरुवातीला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णलयात गेली होती. मात्र प्रसूती काळात काही आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यायोग्य सुविधा नसल्याने तिला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलयात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार रुख्मिणीबाई रुग्णालयाने रुग्णवाहिकेद्वारे तिला कळवा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याठिकाणी तिची प्राथमिक तपासणीसाठी तीला एक दिवस रुग्णलयात ठेवण्यात आले प्रस्तुती साठी तीला वेळ असल्याने दुसऱ्या दिवशी तीला परत जाण्याचा सल्ला देण्यात आला आणि सकाळी  डिसचार्ज देण्यात आले .तसेच अशा परिस्थितीत आपण परत कसे जाणार आपल्यासाठी रुग्णवाहिका किंवा वाहनाची व्यवस्था करण्याची या महिलेने मागणीही केली. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यावर या महिलेने तिकडे उपस्थित पोलिसांनाही मदतीसाठी साकडे घातले परंतु त्यांच्याकडूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही

त्यामुळे अखेर नाईलजास्तव ही गर्भवती महिलेने रेल्वे ट्रेकवरून चालत कल्याणला येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आपल्या ३ वर्षांच्या चिमुरड्याला घेऊन या महिलेने कळवा ते कल्याण एवढे मोठे अंतर अवघडलेल्या स्थितीत चालत पार केले.मन पिळवटून टाकणारी घटना आहे कोरोना महामारीत खरंच महिला वर्ग आणि जनरल रुग्णाची हेळसांड सुरू च आहे या हृदयद्रावक प्रकारामुळे शासनाच्या आरोग्य यंत्रणेतील सावाळा गोधंळ कारभाराला कोण अंकुश लावणार असा सवाल यानिमित्ताने उभा राहिला आहे ?तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी  यानिमित्ताने जोर धरु पाहत आहे.

“तर डॉक्टरातील देव दुत या गर्भवती महिलेच्या मदतीला धावला. कल्याण मधील डॉ आहिरे यांनी  मोफत उपचार करून महिलेची प्रसूती केली त्यामुळे सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे .”तर मानवतील मानवता आजुन देखील शिल्लक असल्याचे यथार्थ चित्र या गर्भवती महिलेच्या घटनेत दिसले.