आशिर्वाद मित्रमंडळातर्फे होणारा दहीहंडी उत्सव रद्द

डोंबिवली : शहरात गेली २५ वर्षे आशिर्वाद मित्र मंडळाच्या माध्यमातून दहीहंडी, नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे दहीहंडी रद्द करण्यात आल्याचे मंडळाने

 डोंबिवली : शहरात गेली २५ वर्षे आशिर्वाद मित्र मंडळाच्या माध्यमातून दहीहंडी, नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे दहीहंडी रद्द करण्यात आल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. याबाबत मंडळाचे अध्यक्ष म्हणतात, सांस्कृतिक डोंबिवली शहरात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत मंडळ विविध कार्य करीत असते. रक्तदान, मोफत आरोग्य शिबीर, गोर-गरीबांसाठी उपक्रम वेळोवेळी केले जातात. प्रतिवर्षी शहरात दहीहंडी उत्सहात आठ थरांची दहीहंडी फोडण्याचा विक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. एक शिस्तबद्ध गोविंदा म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. येथील ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे मंडळाचे प्रमुख सल्लागार असून त्यांचे मार्गदर्शन मंडळाला वैशिष्ठ्यपूर्ण ठरत आहे. नवरात्रोत्सवात डोंबिवली पश्चिम टेलकोस वाडीत आशिर्वाद मित्रमंडळ लक्षवेधी असते.

आशिर्वाद मित्रमंडळाचे अध्यक्ष गजानन देसाई, उपाध्यक्ष सुनील सावंत, सरचिटणीस विश्वनाथ दळवी, खजिनदार प्रदीप गोळे, प्रमुख सल्लागार विश्वनाथ राणे, उप सचिव सदानंद पेडणेकर, उप खजिनदार संतोष घाणेकर आणि सल्लागार रामचंद्र साळुंखे असे पदाधिकारी मंडळासाठी कार्यरत असून एक शिस्तबद्ध मंडळ अशी उपाधी डोंबिवलीकरांकडून मिळालेली आहे. कोरोनाचे संक्रमण विभागात होऊ नये यासाठी मंडळ पालिका प्रशासनासाठी मदत करीत आहे. सध्या कोरोनाग्रासतांची संख्या वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर न पडता घरातच राहून कोरोनावर विजय मिळावा, असा संदेश मंडळाच्या माध्यमातून विभागात दिला जात आहे.
मंडळाच्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक विक्रांत ढवळे यांनी प्रत्येक वर्षी गोविंदा पथकाला दिलेल्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे उंच दहीहंडी फोडण्यात मंडळाचे गोविंदा यशस्वी झाले आहेत, असे मंडळ पदाधिकारी सांगतात. मात्र यावर्षी हा उत्सव कोरडा जाणार असल्याने येथील गोविंदामध्ये मानसिक नाराजी झाली आहे. मात्र कोरोनावर विजय मिळविल्यानंतर पुढील वर्षी मोठया उत्साहात गोविंदा साजरा करू, असेही ठामपणे सांगण्यात येत आहे.