कोपरोली येथे भाताचे बाराशे भारे आगीत जळून खाक

भिवंडी - भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील कोपरोली येथे एका शेतकऱ्यांच्या शेतात ठेवलेल्या भाताच्या भाऱ्याना आकस्मित आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. कोपरोली येथे राहणारे

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील कोपरोली येथे एका शेतकऱ्यांच्या शेतात ठेवलेल्या भाताच्या भाऱ्याना आकस्मित आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. कोपरोली येथे राहणारे जेष्ठ शेतकरी दत्तू शेळके वय ८५ वर्ष यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेत शेतावरील खळ्यात १२ शे भाताचे भारे गेल्या तीन महिने पासून राखुन ठेवले होते लॉकडाऊन संपला की सदर चारा विकुन दोन पैसे हाताशी मिळतील या आशेत असतानाच काल रात्री च्या सुमारास अज्ञात कारणाने  या पेढ्याचा भाऱ्यांना आग लागली असल्याने हे सर्व आगीत भस्मसात झाले.

त्यामुळे आधीच करोना या महामरीच्या विळख्या मूळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या  हा शेतकरी आणखी अडचणीत आला आहे, त्यामुळे प्रशासनाने मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे, या प्रकरणी तलाठी सजा अंबाडी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे या भाऱ्याची किंमत अंदाजे  अठेचाळीस हजार रुपये आहे तसेच गणेशपुरी पोलीस ठाणे येथे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे