एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करत असल्याचे सांगून महिलेस ७० हजाराला लुटले

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या महिला मजुरास एका भामट्याने एटीएममधून पैसे काढण्यास मदत मागत त्या आरोपीने एटीएम कार्ड

 भिवंडी: भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या महिला मजुरास एका भामट्याने एटीएममधून पैसे काढण्यास मदत मागत त्या आरोपीने एटीएम कार्ड हातात घेऊन त्या मशीनमध्ये टाकले व पैसे निघत नसल्याचे भासवून तिचे एटीएम कार्ड हातचलखीने बदलून बनावट एटीएम कार्ड  मजुराला दिले. तो मजूर निघून गेल्यावर तिच्या एटीएममधून ७० हजार काढून तो आरोपी फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच तिने कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला 

कोनगावच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये ४५ वर्षीय कामगार पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी आधीपासूनच त्यांच्या मागावर असलेल्या अनोळखी व्यक्तीची एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत घेतली. त्याने एटीएममधून पैसे निघत नसल्याचे सांगून या मजूराचे एटीएम कार्ड हातचलाखीने काढुन घेतले. त्या मजूराला खोटे कार्ड देऊन त्याच्या खात्यावरील ७० हजार काढून घेतले. या प्रकरणी कोनगाव पोलीस लवकरच या चोरट्यांच्या मुसक्या आवळतील, अशी माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आर. टी. काटकर यांनी दिली.