एटीएममध्ये पैसे काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात कोनगाव पोलिसांना यश

भिवंडी :कोनगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या भोळेपणाचा फायदा घेत त्यांना मदत करीत असल्याचे भासवून त्यांच्या एटीएम कार्डाची चोरी करून

भिवंडी :कोनगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या भोळेपणाचा फायदा घेत त्यांना मदत करीत असल्याचे भासवून त्यांच्या एटीएम कार्डाची चोरी करून त्याद्वारे पैसे काढून फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे . या बाबत माहिती अशी की २५ जून रोजी कोनगाव  येथील युनियन बँक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीची फसवणूक करीत आपल्याकडील बनावट एटीएम व्यक्तीस देऊन त्याच्या एटीएम कार्डाद्वारे २५ हजार काढून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या नेतृत्वा खालील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्रसिंग गिरासे , पोलीस हवालदार राजेश शिंदे , संतोष मोरे , किरण पाटील , संतोष पवार , कृष्ण महाले ,भागवत दहिफळे ,नरेंद्र पाटील या  पथकाने ठिकठिकाणी सापळा लावून व गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता एटीएम मशीनमधून पैसे काढून देताना फसवणूक करणारे तिघे जण कोनगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर संशयास्पद फिरणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेत चौकशी केली असता त्यांनी २४ जून रोजी डेबिट कार्ड बतावणी व हातचलाखी करून २५ हजार रुपये काढल्याचे सांगितले. त्यासोबत कोनगाव  पोलीस ठाण्यात १० जून रोजी युनियन बँक एटीएम येथे अशाच पद्धतीने ६० हजार काढल्याचे कबुली दिली. या त्रिकुटाकडून ४७ हजार रोख रक्कम , १२ हजार रुपयांचे दोन मोबाईल व ८० हजार रुपये किमतीची केटीएम दुचाकी असा १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .