डोंबिवलीमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी एटीएम व्हॅनची सेवा

डोंबिवली : लॉकडाऊन काळात सर्वच नागरिकांना बँकेत जाणे शक्य होत नाही. तसेच बरेच वेळा एटीएममध्ये कॅश नसते किंवा लांबच्यालांब रांगा असतात. यामुळे कॅश काढणे शक्य होत नाही. यामुळे अनेक लोकांच्या

 डोंबिवली : लॉकडाऊन काळात सर्वच नागरिकांना बँकेत जाणे शक्य होत नाही. तसेच बरेच वेळा एटीएममध्ये कॅश नसते किंवा लांबच्यालांब रांगा असतात. यामुळे कॅश काढणे शक्य होत नाही. यामुळे अनेक लोकांच्या तक्रारी आल्यामुळे कृष्णा पाटील यांनी फेडरल बँक अधिकाऱ्याशी बोलणी केली. बँकेची एटीएम व्हॅनची सेवा पश्चिम विभागात देण्यात आली आहे. चालती-फिरती एटीएम अनोखी सेवा आणि स्वच्छ सुंदर डोंबिवली आदी उपक्रमामुळे पश्चिम डोंबिवलीतील नागरिकांचे भाजपा कार्यकर्ते कृष्णा पाटील आणि त्यांचे सहकारी लक्ष वेधून घेत आहेत.

पश्चिम विभागातील जुनी डोंबिवली गावात व  ठाकुरवाडी परिसरात आज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत एटीएम सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान चालते-फिरते एटीएम बेडेकर गल्ली, गावदेवी गिरजा माता मंदिर, जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड क्रमांक १, भारत माता शाळा पुढे जुनी डोंबिवली गाव, नेमाडे गल्ली हिंदुकुश अपार्टमेंट जवळ, विजय मित्र मंडळ एकवीरा नगर आदी विभागात फिरणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.