ठाण्यातील सचिन वाझे यांच्या व्यावसायिक ऑफिस आणि गाळ्यावर एटीएसची छापेमारी

सचिन वाझे यांच्या ठाण्यातील व्यावसायिक ऑफिस आणि गाळे यांच्यावर छापेमारीसाठी शिवदीप लांडे आणि राजकुमार शिंदे यांची पूर्वी बैठक झाली. त्यानंतर एटीएस टीम विनायक शिंदे याना घेऊन सचिन वाझे यांच्या घरी गेले. त्यानंतर कळव्यात राहत असलेला विनायक शिंदे याच्या घरीही एटीएस टीम गेली.

  • ठाण्यात एटीएसच्या दोन टीमने केली छापेमारी

ठाणे : मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएस पथकाने दोन आरोपीना अटक केल्यानंतर आणि त्यांना ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवल्याने आता चौकशीत धक्कादायक खुलासे आणि अनेकांची नावे पुढे येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दरम्यान एटीएसच्या दोन पथकांनी ठाण्यात सचिन वाझे यांच्या व्यावसायिक ऑफिस आणि गाळे यांच्यावर छापेमारी केली.ता मोटोजर्सन ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भिवंडीतील गोदामावरही छापेमारी केली.

सचिन वाझे यांच्या ठाण्यातील व्यावसायिक ऑफिस आणि गाळे यांच्यावर छापेमारीसाठी शिवदीप लांडे आणि राजकुमार शिंदे यांची पूर्वी बैठक झाली. त्यानंतर एटीएस टीम विनायक शिंदे याना घेऊन सचिन वाझे यांच्या घरी गेले. त्यानंतर कळव्यात राहत असलेला विनायक शिंदे याच्या घरीही एटीएस टीम गेली. त्यानंतर एटीएस पथक पुन्हा मुंब्रा रेतीबंदर येथे विनायक शिंदे याना घेऊन गेले. तर त्यावेळीच दुसरी एटीएसची टीम ठाणे, माजिवडा परिसरातील सचिन वाझे यांच्या कंपनीच्या ऑफिस आणि गाळ्यावर छापेमारी केली. तर भिवंडी येथेही वाझेच्या कंपनीचे गोदाम आहे त्याचीही तपासणी केली.

मनसुख हिरेन हत्येच्या वेळी आरोपी शिंदेची उपस्थिती?

सोमवारी सकाळपासून एटीएसच्या दोन टीम ठाण्यात सक्रिय झाल्या. दोन आरोपी विनायक शिंदे आणि बुकी नरेश याला एटीएसने अटक केल्यानंतर मनसुख हत्या प्रकरणातील महत्वाचे दुवा एटीएसच्या हातात सापडला आहे. तर सोमवारी एटीएस पथकाने आरोपी विनायक शिंदे याला एटीएस तिने पहिल्यांदाच सचिन वझे यांच्या घरी नेले. सचिन वाझे यांचा परिचय वाझे यांचं कुटुंबाशी आहे काय? याची चाचपणी केली. त्यानंतर विनायक शिंदे हे राहत असलेले कळवा येथील त्यांच्या घरी नेण्यात आले त्यानंतर त्यांना मुंब्रा रेतीबंदर येथेही नेण्यात आले. मात्र अटक दुसरा आरोपी बुकी नरेश याला मात्र कुठेच नेण्यात आले नसल्याने एटीएसला संशय आहे कि, मनसुख हत्येत विनायक शिंदे यांचा साकरीय रोल असून चौकशीत एटीएस त्याच्याकडून हत्या कशी केली आणि मृतदेह कसा मुंब्रा खाडीत आला याबाबत चौकशी करणार असलयाचे संकेत मिळाले आहेत.

वाझेच्या कंपनीवर आणि गोदामावर छापा

सचिन वाझे याच्या माजीवाडा येथील मोटोजर्सन ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यलयावर छापेमारी केली. तर वाझेच्या मोटोजर्सन ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे गोदाम असलेल्या भिवंडीतही छापेमारी केली. दरम्यान मनसुख हत्येत सहभागी असलेल्या आरोपींची कस्टडी मिळवल्यानंतर एटीएस पथक हे वाझे यांच्या संपत्तीची चौकशी करीत आहेत. मात्र या धाडसत्रात एटीएस पथकाच्या हाताला काय लागले याबाबत गुप्तता बाळगण्यात आलेली आहे.