B N N College Bhivandi

भिवंडी शहर हे पॉवरलूम कामगारांचे शहर आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेकांना रोजगार नाही प्रत्येक पालकाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत पालकांना मुलांना शिकविणे जिकिरीचे झाले आहे.

भिवंडी : शहरातील पदमश्री आण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी एन एन महाविद्यालय (B. N. N. college) असून येथे प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची आर्थिक (Financial ) लूट केली जात आहे. त्याविरोधात बहुजन विद्यार्थी संघटना (Bahujan Vidyarthi Sanghatana ) आक्रमक (aggressive) झाली आहें. कोरोना जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना (students) प्रवेश घेताना टप्प्याटप्प्याने प्रवेश शुल्क घ्यावे असे राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाचे आदेश असतानाही बी. एन. एन. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ हे विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रवेश शुल्क घेत आहेत.

भिवंडी शहर हे पॉवरलूम कामगारांचे शहर आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेकांना रोजगार नाही प्रत्येक पालकाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत पालकांना मुलांना शिकविणे जिकिरीचे झाले आहे. राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत द्यावी असे आदेश असतानाही प्राचार्य अशोक वाघ हे शासनाच्या नियमाविरोधात जाऊन विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेश शुल्क घेतल्याशिवाय प्रवेश देत नाहीत. त्यामुळे अनेक गरीब विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत असा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी केला आहे.

याच महाविद्यालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडूनही नियमाच्या बाहेर जाऊन प्रवेश शुल्क घेतले आहे. मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहावेत म्हणूनच प्राचार्य वाघ हे जाणीवपूर्वक जास्त प्रवेश शुल्क घेत आहेत असा आरोपही अनिल वाणी यांनी केला आहे. याविरोधात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना महाविद्यालयाची  चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बी एन एन महाविद्यालयात इयत्ता ११वी अनुदानित तुकडीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वीत प्रवेश घेताना विनाअनुदानित तुकडीत प्रवेश देऊन फी घेतली जाते याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी अनिल वाणी यांनी शिक्षण उप संचालक मुंबई विभाग यांनी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी दिला आहें