डोंबिवलीमध्ये ‘बाज- आर आर’ रुग्णालयातून ६ रुग्णांना डिस्चार्ज

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरक्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक होत आहे. डोंबिवली विभागात शास्त्रीनगर, निऑन आणि बाज-आरआर या रुग्णालयातून कोरोना रुग्णांवर देखभाल व

 डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरक्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक होत आहे. डोंबिवली विभागात शास्त्रीनगर, निऑन आणि बाज-आरआर या रुग्णालयातून कोरोना रुग्णांवर देखभाल व उपचार केले जात आहेत. महापालिका क्षेत्रात कोरोनाचे सुमारे  रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी सकाळी शहरातील ‘बाज-आरआर’ रुग्णालयातून सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी तेथील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत टाळ्या वाजून त्यांना शुभेच्छा दिल्या.

‘बाज-आरआर’ रुग्णालयातील अमीर कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित २६ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये लहान बाळ, महिला आणि पुरूष अशा विविध वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. तीन रुग्ण आयसीयू मध्ये असून त्यांचावर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. ‘बाज-आरआर’च्या दहा डॉक्टरांची टिम सतत कोरोना रुग्णांवर लक्ष ठेऊन आहे. तसेच येथील नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारीवर्ग रुग्णांसाठी झटत आहेत. विशेष म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या इतर आजारावर ‘बाज-आरआर’मध्ये उपचार केले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला इतर कोणत्याही आजारावर बाहेरील रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने येथील डॉक्टर अशा रुग्णावर उपचार करीत आहेत. कोरोना बाधित रुग्णावर ‘बाज-आरआर’मध्ये अँजोप्लास्टी करण्यात आली तीही यशस्वी झाली. रुग्णालयात आता कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी प्रसूती विभाग करण्यात येत आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितले कि, शहरातील आय.एम.ए’चे डॉक्टर चौवीस तास सेवा देत असून त्यांचेही मोठे योगदान आम्हांला मिळत आहेत. याबाबत आय.एम.ए’चे डॉक्टर महेश पाटे म्हणाले, इंडियन मेडिकल असोशिएशनचे डॉक्टर येथे मेहनतीने काम करीत आहेत. जेव्हा पेशंट बरा होऊन घरी जातो तेव्हा जो आनंद होतो तसाच आनंद आज झाला आहे. या निमित्ताने जनतेला विनंती आहे कि, अशाप्रकारे काम करतांना डॉक्टरांनाही संसंर्ग होऊन दुर्दैवाने काही डॉक्टरांना कोरोना होत आहे आणि तो ही अपघाताने होत आहे. अशा डॉक्टरांची हेटाळणी होत असून वाईट वागणूक मिळत आहे ते होऊ नये अशी माफक अपेक्षा आहे. कोरोना विषाणू आजारात शासनाने प्रोफेशनल लोकांचे सल्ले विचारात घ्यावेत त्याचा नक्कीच उपयोग होईल.

 डिस्चार्ज झालेल्या महिला रुग्णांची बोलकी प्रतिक्रिया : जेव्हा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तेव्हा खूप घाबरले होते. मनात लोकांनी खूप भीती घातली कि तुम्ही पुन्हा येणारच नाही. पण येथील डॉक्टर आणि सर्वांनी खूप काळजी घेतली आणि आज बरी झाली आहे. कोरोनामुळे खूप शिकण्यासाठी मिळालं.