court

कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी दहागावजवळ भाजप आमदार किसन कथोरे(mla kisan kathore) यांचा गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार एक तरुण आणि एक तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. टिटवाळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकास अटक केले. सोमवारी कल्याण जिल्हा सत्र नान्यालयात त्याला हजर केले असता जामिनावर मुक्तता(bail granted) करण्यात आली.

टिटवाळा : कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी दहागावजवळ भाजप आमदार किसन कथोरे(mla kisan kathore) यांचा गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार एक तरुण आणि एक तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. टिटवाळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकास अटक केले. सोमवारी कल्याण जिल्हा सत्र नान्यालयात त्याला हजर केले असता जामिनावर मुक्तता(bail granted) करण्यात आली.

रविवारी संध्याकाळीच्या सुमारास दहागाव नजीक आमदार किसन कथोरे यांच्या कारची आणि मोटारसायकलच्या धडकेत कल्याणमधील पिसवली परिसरात राहणार आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला मोटारसायकल स्वार अमित सिंग , त्यांच्यासोबत असलेली तरूणी सिमरन सिंग या दोघांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा पोलिसांनी कार चालक किरण भोपी यांस अपघात प्रकरणी अटक करीत सोमवारी कल्याण जिल्हा सत्र नान्यालयात हजर केले असता न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली .