लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून बल्याणी भागात नगरसेविकेने ५००० जणांना घरपोच पोहोचविल्या जीवनावश्यक वस्तू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११ -बल्याणी हा भौगोलिकदृष्ट्या मोठा परिसर आहे. या भागात बहुसंख्येने गरिब लोकवस्ती आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११ -बल्याणी हा भौगोलिकदृष्ट्या  मोठा परिसर आहे. या भागात बहुसंख्येने गरिब लोकवस्ती आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन झाले असल्याने या परिसरातील नागरिकांसाठी माजी नगरसेवक मयुर पाटील , शिक्षण मंडळ सभापती, स्थानिक  नगरसेविका नमिता पाटील यांनी मदतीचा हात दिला आहे. टिपन्नानगर, एन् आर् सी कॉलनी, मोहेली, बल्याणी, उभार्णी, मातादी मंदीर टेकडी परिसर, सरनोबत नगर, इंदिरा नगर ,आदिवासी पाडा या परिसरातील गोर,गरीब, वंचित ,बिगारी कामगार अशा रहिवाशांना ५०००हुन अधिक जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाल्याच्या ५ हजारपेक्षा अधिक किटचे नागरिकांना घरपोच वाटप करण्यात आले. जीवनावश्यक कीटमध्ये ५ किलो तांदूळ, अर्धा किलो तुरडाळ, १किलो बटाटे,१किलो कांदे, १किलो खाद्य तेल या जीवनावश्यक वस्तू होत्या. तसेच भाजीपाला कीटही देण्यात आले. लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून मयुर आणि  नमिता पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.