बारवी धरण प्रकल्पातील पीडित कोळे वडखळवासीयांची ४२ वर्षांनंतरही परवड कायम

मुरबाड: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरण प्रकल्पातील पीडितांची ससेहोलपट कायम आहे.मागील वर्षी चारी बाजुंनी पाण्याने वेढल्यामुळे पुनर्वसन न झालेल्या कोळे वडखळ गावाला बेटाचे स्वरूप आले होते. तर

मुरबाड: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरण प्रकल्पातील पीडितांची ससेहोलपट कायम आहे.मागील वर्षी चारी बाजुंनी पाण्याने वेढल्यामुळे पुनर्वसन न झालेल्या कोळे वडखळ गावाला बेटाचे स्वरूप आले होते. तर आठ महिने या गावाचा जगाशी संपर्क तुटला होता. यंदाही त्यांचे पुनर्वसन रखडल्याने या आदिवासींवर ऐन पावसाळ्यात मोठे संकट कोसळले आहे.

बारवी धरणाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले उंचीवाढीचे काम मार्गी लागल्याने मागील वर्षापासून धरणाचे दरवाजे बंद करून अतिरिक्त जलसाठा करण्यात येतो.मात्र या वाढलेल्या पाणी साठ्यामुळे धरणक्षेत्रालगत पुनर्वसन न झालेल्या कोळे वडखळ गावाला पावसाळ्यात बेटाचे स्वरूप येते. मागील वर्षी आठ महिने या गावाचा जगाशी संपर्क तुटला होता.चहूबाजूंनी पाणी असल्याने येथील शाळकरी मुले, शेतकरी, रुग्ण,बाजारहट करणारे रहिवाशांना आठ महिने बोटीतुन प्रवास करावा लागला.शासनाच्या अनास्थेमुळे या वर्षीही येथील रहिवाशांचा जीव टांगणीला लागल्याने येथील ३५ कुटुंबांनी गावाला रामराम ठोकत पुनर्वसनासाठी मागणी केलेल्या जागेत तात्पुरत्या राहण्याची सोय म्हणून स्वकष्टाने झोपड्या उभारल्या आहेत. बारवी प्रकल्प बाधित गावांपैकी बहुतेक गावांचे पुनर्वसन झाले आहे.या गावालाही पुनर्वसनासाठी जागा देण्यात आल्या होत्या,  मात्र यातील एक जागा ही त्यांच्या शेतजमीनीपासून दूर तर एक दफनभूमी जवळ असल्याने गावकऱ्यांनी या दोन्ही जागा नाकारल्या आहेत.ज्या तिसऱ्या वनखात्याच्या जागेची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी केवळ बुडित क्षेत्रातील चौदा हेक्टर जागा प्रकल्पास मिळाली,उर्वरित पाच हेक्टर जागा नं मिळाल्याने हे पुनर्वसन रखडले आहे. ठाणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी येथील गोरगरीब शेतकरी आणि आदिवासींनी पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या जमिनी शासनाला दिल्या. मात्र शासनाच्या ढिसाळ आणि सुस्त कारभारामुळे या पीडितांची पुनर्वसनाची व्यथा ४२ वर्षानंतरही कायम आहे.