भारतीय मजदूर संघाने कोरोनाच्या युद्धातल्या सैनिकांना शुभेच्छापत्र देत मानले आभार

कल्याण : भारतीय मजदूर संघाच्या वतीने बुधवारी राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सुरू असणाऱ्या कोरोना या महामारीच्या काळात संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही नागरिकांच्या सेवेसाठी

कल्याण : भारतीय मजदूर संघाच्या वतीने बुधवारी राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सुरू असणाऱ्या कोरोना या महामारीच्या काळात संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता पोलीस बांधव, डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन कर्मचारी, टपाल, वीज, रक्षा विभाग कर्मचारी, अंगणवाडी,आशा, बँक कर्मचारी, शेतकरी, सैनिक, सुरक्षा रक्षक, स्वछता, सफाई कामगार, पत्रकार मंडळी आपली सेवा देत आहेत. भारतीय मजदूर संघाचे सगळे कामगार हे कोरोना सैनिकांच्या सोबत आहेत हा विश्वास देण्यासाठी या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत कोरोनामध्येही आपली सेवा देणाऱ्यांना भेटून शुभेच्छापत्र, फुले देऊन त्यांचे सर्वांचे आभार मानण्यात आले.  कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टाफ, पोलीस बांधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
डोंबिवली पूर्व रामनगर येथील पोलीस स्टेशन येथे भारतीय मजदूर संघ अध्यक्ष शोभा अंबरकर आणि जिल्हा चिटणीस भरत गोडांबे यांनी पोलीस बांधवांचे आभार मानले. ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वेगवेगळ्या उद्योगातील एकूण ५० हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी श्रद्धांजली व राष्ट्रगीताचा कार्यक्रम केला.