भिवंडीच्या नागरिकांनी केले सफाई कर्मचाऱ्यांचे औक्षण

भिवंडी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम पालिकेच्या वतीने विविध भागात केली जात आहे. ही स्वच्छता मोहीम पालिकेचे आरोग्य व स्वच्छता विभागातील

 भिवंडी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम पालिकेच्या वतीने विविध भागात केली जात आहे. ही स्वच्छता मोहीम पालिकेचे आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या माध्यमातून राबविली जात आहे. त्यामुळे शहरातील अशोक नगर या भागात राहणाऱ्या नागरिकांनी माणुसकीच्या धोरणातून सफाई कामगार व महिलांची आरती ओवाळून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच यावेळी त्यांना अल्पोपहार देण्यात आला.

कोरोना आजाराचा फौलाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील विविध भागात औषध फवारणी व स्वच्छता राबविण्याचा उपक्रम महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छता उपक्रम महिला व पुरुष कर्मचारी दररोज सकाळी करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना अनेकदा वेळेवर जेवण मिळत नाही. त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून आज सकाळी शहरातीक अशोक नगर येथील इमारत क्रमांक ९ मधील सोसायटीतील सचीन कासुर्डे व निलेश कोपर्डे यांच्या पुढाकाराने पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी अशोक संखे ,राजेंद्र घाडगे ,अनंता जाधव ,जमुना बाई ,राजेशश्र्वरी ताराबाई ,महेश जाधव यांच्या सह ६० सफाई कर्मचाऱ्यांचा सोसायटीच्या महिलांनी औक्षण करून त्यांना गुलाबाची फुले देऊन गौरव केला. तसेच टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले .