भिवंडीतील यंत्रमाग व वीटभट्टी कामगारांना आर्थिक मदत देण्याची काँग्रेसची मागणी

भिवंडी : कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरू होऊन ५०दिवस होत आले असतानाही येथील यंत्रमाग, वीटभट्टी ,रिक्षा चालक व मालक,पालिका कर्मचारी, बिल्डींग कामगार यांच्या आर्थिक संकट व उपासमारीची वेळ आल्याने

 भिवंडी : कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरू होऊन ५०दिवस होत आले असतानाही येथील यंत्रमाग, वीटभट्टी ,रिक्षा चालक व मालक,पालिका कर्मचारी, बिल्डींग कामगार यांच्या आर्थिक संकट व उपासमारीची वेळ आल्याने त्यांना शासनाने मदत करून त्यांना अन्नधान्य सह वीज बिल माफ करावे, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र कोकण मुस्लिम विकास मंडळाचे अध्यक्ष इरफान पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनाव्दारे केलेल्या मागणीत शहरातील  कामगारांना देण्यात येत असलेले जेवण हे कमी प्रमाणात मिळत असल्याने पालिका क्षेत्रातील कम्युनिटी किचनच्या संख्या वाढवावी. तसेच पालिका व शासकीय वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करावे. शहरातील दोन हजार रिक्षा असून त्यांनी घेतसलेले कर्ज स्थितील करावे. तसेच त्यांना ५ हजार रुपये भत्ता द्यावा. अन्नधान्य वाटप करताना शिधावाटप अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे तर सफेद शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य देण्यात यावे. बांधकाम व इमारत कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय देण्यात यावे. वीटभट्टी मजूर व आदिवासी कामगार यांना दोन वेळचे जेवण देण्यात यावे,अशा विविध मागण्यांचे पत्र इरफान पटेल यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.