भिवंडी महानगरपालिका आयुक्त पदावरुन डॉ प्रविण अष्टीकर यांची उचलबांगडी- पंकज आसिया नवे आयुक्त

भिवंडी: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महानगरपालिका प्रशासन त्यास आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याबाबत लोकप्रतिनिधी व नागरीकांमधून आरोप केले जात असतानाच

 भिवंडी: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महानगरपालिका प्रशासन त्यास आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याबाबत लोकप्रतिनिधी व नागरीकांमधून आरोप केले जात असतानाच महानगरपालिका आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरत असताना,राज्य शासनाने आज तडकाफडकी डॉ प्रविण अष्टीकर यांची भिवंडी महानगरपालिका आयुक्त पदावरुन उचलबांगडी करुन त्यांच्या ठिकाणी नाशिक उपजिल्हाधिकरी तथा कळवण येथील प्रकल्प अधिकारी डॉ पंकज आसिया या २०१६ च्या तुकडीतील आय ए एस अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे .शनिवारी सायंकाळी त्यांनी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयातील दालनात येऊन आपला पदभार स्विकारला आहे .

 डॉ प्रविण अष्टीकर यांच्या कर्यकाळात झालेले आर्थिक निर्णय वादग्रस्त ठरल्याबाबत त्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे आमदार रईस शेख  यांच्यासह , शिवसेना आमदार शांताराम मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ने निवेदन देवुन मागणी केली होती .राज्य शासनाने महानगरपालिका प्रशासन प्रमुख आयुक्त म्हणून आय ए एस अधिकारी नियुक्तीचे भिवंडीकर नागरीकांनी स्वागत केले आहे .