भिवंडी मनपातील महिला लिपिक कर्मचाऱ्यास शिवीगाळ करणे उपायुक्तांना भोवले

भिवंडी: भिवंडी शहर पालिकेच्या आस्थापन विभागात काम करणाऱ्या लिपिक महिलेस पालिकेचे उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी अपशब्द वापरल्याने ही महिला उपायुक्तांच्या दालनातच बेशुद्ध पडल्याची खळबळजनक भिवंडी

भिवंडी: भिवंडी शहर पालिकेच्या आस्थापन विभागात काम करणाऱ्या लिपिक महिलेस पालिकेचे उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी अपशब्द वापरल्याने ही महिला उपायुक्तांच्या दालनातच बेशुद्ध पडल्याची खळबळजनक भिवंडी महापालिकेत काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. उपायुक्त कुरळेकरांवर कारवाई व्हावी, यासाठी महिला कर्मचाऱ्यांसह कामगार कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर उपायुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. मात्र उपयुक्तांवर कारवाई कारण्यात यावी अन्यथा उपयुक्त कामावर हजर झाल्यास त्यांच्या तोंडाला काळे फसण्यात येईल असा इशारा कामगार कृती समितीच्या वतीने देण्यात आला होता. अखेर मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी कामगार कृती संघटनेचा वाढता विरोध लक्षात घेत उपायुक्त दिपक कुरळेकर यांच्याकडे असलेली सामान्य प्रशासन विभाग मुख्यालय तसेच अनधिकृत बांधकाम विभाग , शहर विकास विभाग , आपत्ती व्यवस्थापन विभाग , अग्निशमन विभाग , भविष्य निर्वाह निधी विभाग , माहिती व जनसंपर्क विभाग , निवडणूक विभाग , दूरध्वनी विभाग , स्थानिक संस्था कर विभाग , जनगणना विभाग , संगणक विभाग अशी एकूण बारा विभाग होते यातील अनधिकृत बांधकाम विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थाकर हे विभाग वगळता इतर विभागांची जबाबदारी उपायुक्त दिपक कुरळेकर यांच्याकडून काढून घेतली. मनपाच्या उपायुक्त नूतन खाडे यांच्याकडे या अकरा विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्तांनी केलेल्या या कारवाईचा कामगार कृती समितीकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.