भिवंडीच्या आयुक्तांचा दणका, खर्च आणि बिलांमध्ये तफावत जाणवल्याने लेखाधिकाऱ्याकडून चेक बुक आणि फाईल जप्त

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा डॉ पंकज आशिया यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. आशिया यांना सर्व विभागाच्या पदाधिकारी यांची बैठक घेतल्यानंतर विविध विभागात झालेली कामे आणि

 भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा डॉ पंकज आशिया यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. आशिया यांना सर्व विभागाच्या पदाधिकारी यांची बैठक घेतल्यानंतर विविध विभागात झालेली कामे आणि त्यासंदर्भातील बिलांमध्ये मोठया प्रमाणात तफावत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी लेखाधिकारी जाधव यांच्याकडून चेक बुक जप्त करून दीडशेहुन अधिक बिलाच्या फायली आपल्या ताब्यात घेतल्याने पालिकेच्या ठेकेदार वर्गात एकच खळबळ माजली आहे.

भिवंडी पालिकेचे माजी आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांची बदली होऊनही जुन्या तारखेच्या बिलिग फाईलवर ते सह्या करीत असल्याचे नवनियुक्त आयुक्त डॉ आशिया यांच्या निर्दशनास आल्याने तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांच्या डून मिळालेल्या माहिती वरून लेखविभागात मागील तारीख दाखवून धनादेश तयार करत असल्याचे डॉ आशिया यांना समजताच त्यांनी ठेकेदारांच्या दीडशेहुन अधिक बिलाच्या व एमबी रेकॉडींग केलेल्या फाईली आणि चेक बुक जप्त करून आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत आयुक्त डॉ अशिया यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकले नाही.