भिवंडीत एकाच दिवसात १८० जण झाले बरे –  ९७ नवे रुग्ण ; ९ जणांचा मृत्यू

भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांनाच रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. शुक्रवारी शहरातील १४९ तर ग्रामीण भागातील ३१ असे तब्बल १८० रुग्ण

 भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांनाच रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. शुक्रवारी शहरातील १४९ तर ग्रामीण भागातील ३१ असे तब्बल १८० रुग्ण एकाच दिवसात बरे झाले आहेत. दरम्यान शुक्रवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे ६७ नवे रुग्ण आढळले असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ग्रामीण भागात ३० नवे रुग्ण आढळले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आज शहर व ग्रामीण भागात एकूण ९७ नवे रुग्ण आज आढळले आहेत.  भिवंडी शहरात आतापर्यंत ७९४ रुग्ण आढळले असून त्यापैकी ४२१ रुग्ण बरे झाले आहेत तर ६४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ३०९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत ३५१ रुग्ण आढळले असून त्यापैकी १४७ रुग्ण बरे झाले आहेत तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान शुक्रवारी आढळलेल्या ९७ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ११४५वर पोहचला असून त्यापैकी ५६८ रुग्ण बरे झाले आहेत तर ७२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५०५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.