भिवंडीत एसआरपीएफ जवानाला कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा ४३ वर

भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांनाच सोमवारी शहरातील कर्तव्यावर असलेेल्या एसआरपीएफच्या एका जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या २७ जवानांना क्वारंटाईन

भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांनाच सोमवारी शहरातील कर्तव्यावर असलेेल्या एसआरपीएफच्या एका जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या २७ जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे भिवंडी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या एका एसआरपीएफ जवानाच्या पॉझिटीव्ह अहवालामुळे शहरातील शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४३ वर पोहचला असून आतापर्यंत शहरातील १९ रुग्ण बरे झाले आहेत व एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील २३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

ग्रामीण भागातील खोणी गावातील ४७ वर्षीय पुरुष व कोनगाव येथील ३१ वर्षीय पुरुष असे दोन नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागातील टेंभिवली येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही महिला हृदयविकाराच्या आजारानेदेखील त्रस्त असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. आज दोन नवे रुग्ण आढळल्याने भिवंडी ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५३ वर पोहचला आहे तर १४ रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर ३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा ९६ वर पोहचला असून त्यापैकी ३३ रुग्ण बरे झाले आहेत तर दोन जणांचा मृत्यू झाला असून सध्या ६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.