भिवंडीत गेल्या २४ तासांमध्ये आढळले १२ कोरोना रुग्ण

भिवंडी: भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच गुरुवारी शहरात तीन तर ग्रामीण भागात नऊ असे बारा नवे रुग्ण आढळले आहेत. या बारा नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा

 भिवंडी: भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच गुरुवारी शहरात तीन तर ग्रामीण भागात नऊ असे बारा नवे रुग्ण आढळले आहेत. या बारा नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १८५ वर पोहचला आहे.  भिवंडी शहरात ३ नवे कोरॉना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यामध्ये दिवानशाह दर्गा परिसरात राहणारे ३७ वर्षीय एका डॉक्टरचा देखील समावेश आहे. हे डॉक्टर ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथून आले होते. दुसरा रुग्ण ४७ वर्षीय कोंबड पाडा येथील महिला पुणे येथून आली आहे. तर तिसरा रुग्ण टेमघर पाईप लाईन परिसरातील ४५ वर्षीय महिला वसई येथुन आली होती. शहरातील या तीन नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा १०५ वर पोहचला असून आतापर्यंत ४३ रुग्ण बरे झाले आहेत तर चार जणांचा मृत्यू झाला असून ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागातील कोनगाव येथे २९ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे तसेच खारबाव येथे ८ नवे रुग्ण आढळले आहेत. या आठ रुग्णांमध्ये एका १० वर्षीय मुलासह चार पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. या नऊ नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्णांचा आकडा ८० वर पोहचला असून त्यापैकी ४६ रुग्ण बरे झाले असून तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर ३१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा आता १८५ वर पोहचला असून त्यापैकी ८९ रुग्ण बरे झाले आहेत तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.