भिवंडीत १४ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांचा आकडा २०९ वर

भिवंडी: भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात देखील सात नवे रुग्ण

 भिवंडी: भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात देखील सात नवे रुग्ण आढळले आहेत. या १४ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २०९ वर पोहचला आहे. 

भिवंडी शहरात ७ नवे कोरॉना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यामध्ये नारपोली येथील २७ वर्षीय महिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत होती तसेच गैबी नगर येथील ५२ वर्षीय  महिला मुंब्रा येथील रुग्णालयात दाखल होते तर शहरातील चव्हाण कॉलनी येथील २० वर्षीय महिला मुंबई येथील केईएम रुग्णालयात प्रसूती साठी गेली होती. त्याचबरोबर म्हाडा कॉलनी येथील २० वर्षीय तरुण दिल्ली येथून आला होता या तरुणाचे कोरोना अहवाल पोसिटिव्ह आले आहेत. तर वेताळपाडा येथे राहणारे ५८ वर्षीय इसम हे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्याचबरोबरबाला कंपाउंड येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय वृद्ध इसमास डायलेसीसचा त्रास असून त्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सातवा रुग्ण दर्गा रोड परिसरातील ४४ वर्षीय पुरुष हे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांचे रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आले आहेत. अशा प्रकारे शहरात शनिवारी सात नवे रुग्ण आढळले आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शहरातील या सात नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा ११९ वर पोहचला असून आतापर्यंत ६३ रुग्ण बरे झाले आहेत तर ६जणांचा मृत्यू झाला आहे तर ५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  ग्रामीण भागात देखील आज सात नवे हृन आढळले असून या सात रुग्णांपैकी कशेळी येथे पाच रुग्ण आढळले आहेत, तर कारीवली व दिवे येथे एक एक नवा रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागातील सात नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्णांचा आकडा ९० वर पोहचला असून त्यापैकी ५१ रुग्ण बरे झाले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ३६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
 
भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा आता २०९ वर पोहचला असून त्यापैकी ११४ रुग्ण बरे झाले आहेत तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ८६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.