भिवंडीत आज आढळले ४ कोरोनाग्रस्त, शहरातील संख्या पोहोचली २१ वर

भिवंडी:भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज शहरात २ तर ग्रामीण भागात २ असे ४ नवे रुग्ण आढळले आहे. शहरात आज आढळलेल्या २ नव्या रुग्णांमुळे भिवंडी शहरातील

 भिवंडी:भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज शहरात २ तर ग्रामीण भागात २ असे ४ नवे रुग्ण आढळले आहे. शहरात आज आढळलेल्या २ नव्या रुग्णांमुळे भिवंडी शहरातील रुग्णसंख्या १२ वर पोहोचली होती, मात्र शहरातील अवचीत पाडा येथे बांद्राहुन आलेल्या कोरोना बाधित रुग्णाची गणती मुंबईमध्ये करण्यात आल्याने शहरातील रुग्णसंख्या एकाने कमी झाली असून आता शहरातील एकूण रुग्णसंख्या ११ वर पोहोचली आहे. तर ग्रामीण भागातील २ नव्या रुग्णांमुळे रुग्णांचा आकडा १० वर गेला आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णासंख्या आता २१ वर पोहोचली आहे. शहरातील घुंघटनगर येथील ६५ वर्षीय रुग्णाच्या संपर्कात आलेल्या घुंघट नगर येथील एका ३१ वर्षीय तरुणाचे व मुमताज नगर येथील १८ वर्षीय युवतीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर भिवंडी ग्रामीणमध्ये कशेळी टोल नाका परिसरातील एका ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून चरणीपाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेच्या ७० वर्षीय पतीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णासंख्येमुळे शहरासह ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.