मालेगावहून आलेल्या ‘त्या’ माणसाला कोरोनाची लागण, भिवंडीमधील कोरोना रुग्णांची संख्या २२ वर

भिवंडी: राज्यासह भिवंडीतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी शहरातील निझामपुरा येथील आणखी एका ५८ वर्षीय इसमाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती समोर आली आहे. हा रुग्ण

 भिवंडी: राज्यासह भिवंडीतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी शहरातील निझामपुरा येथील आणखी एका ५८ वर्षीय इसमाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती समोर आली आहे. हा रुग्ण वेताळपाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत मालेगाव येथून आला होता, त्यास क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी त्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ तर ग्रामीण भागात १० असे भिवंडीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या २२ वर पोहचली आहे. शहरातील वेताळपाडा येथे काही दिवसांपूर्वी ५८ वर्षीय व्यक्ती आपल्या इतर सहकाऱ्यांसह मालेगाव येथून भिवंडीत आला होता. या रुग्णाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णास उपचारासाठी ठाणे शासकीय रुग्णालयात पाठविले होते. तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींसह त्याच्या सह प्रवाशांना भिवंडी क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते व वेताळपाडा परिसरदेखील मनपा प्रशासनाने सील केला होता. दरम्यान  मालेगावहुन आलेल्या या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील त्याची ४५ वर्षीय पत्नी व त्याची २३ वर्षीय सून अशा दोघी महिलांचे कोरोना रिपोर्ट देखील यापूर्वी पॉझिटिव्ह आले आहेत. आज (मंगळवारी) या रुग्णासोबत मालेगावहुन आलेल्या निझामपुरा येथील रहिवासी असलेला एका ५८ वर्षीय इसमाचे रिपोर्ट देखील पोसिटिव्ह आले असून या रुग्णाला उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती भिवंडी मनपा प्रशासनाचे वैद्यकिय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांनी दिली आहे.दरम्यान भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून भिवंडी शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या आता २२ वर पोहचली असून भिवंडीकरांसाठी हि धोक्याची घंटा समजली जात आहे.