मुंबईहून भिवंडीला आलेल्या महिलेला कोरोनाची लागण, भिवंडीची रुग्णसंख्या १२

भिवंडी: राज्यासह भिवंडी शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असतांनाच मुंबई येथील आर्थर रोड जेल परिसरात आपल्या माहेरी गेलेल्या ४८ वर्षीय महिलेचे कोरोना रिपोर्ट

 भिवंडी: राज्यासह भिवंडी शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असतांनाच मुंबई येथील आर्थर रोड जेल परिसरात आपल्या माहेरी गेलेल्या ४८ वर्षीय महिलेचे कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे ही महिला कामतघर ब्रह्मानंद परिसरातील रहिवासी असून ही महिला २० मार्च ते २० एप्रिल असा एक महिना मुंबईत आपल्या माहेरी राहिली होती. २० एप्रिल रोजी जेव्हा ही महिला आपल्या सासरी कामतघर ब्रम्हानंद नगर येथे आल्याची माहिती मनपा प्रशासनाला मिळताच अवघ्या अर्ध्या तासातच या महिलेची रवानगी भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात करण्यात आली होती. तर खबरदारी म्हणून या महिलेच्या घरातील ४ जणांना देखील क्वारंटाईन करण्यात आले होते. बुधवारी या महिलेचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या महिलेला शहरातील इंदिरा गांधी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान , ही महिला ही एक महिना मुंबई येथे माहेरी गेली होती तेथून ती परतताच अवघ्या २० मिनिटांच्या आत या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. आज या महिलेचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असले तरी या महिलेची कोरोना रुग्ण गणती ही भिवंडीत होणार नसून या महिलेची कोरोना रुग्ण गणती मुंबई येथील कोरोनाबाधितांच्या यादीतच होणार असल्याची माहिती भिवंडी मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होणार नसून शहरातील रुग्ण संख्या ही १२ एवढी आहे.