भिवंडीत आज ३ कोरोनाबाधितांचा नोंद, शहरातील रुग्णांचा आकडा १६

भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवारी शहरातील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या तीन नव्या रुग्णांमुळे शहरातील आकडा १६ वर पोहचला आहे.शहरातील शांतीनगर

 भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवारी शहरातील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या तीन नव्या रुग्णांमुळे शहरातील आकडा १६ वर पोहचला आहे. शहरातील शांतीनगर येथील ६० वर्षीय व्यक्ती एका महिन्यांसाठी गुजरात अहमदाबाद येथे गेला होता. हा व्यक्ती २८ एप्रिल रोजी भिवंडीतील शांतीनगर येथे घरी परतले होते. त्यांच्या घरी आल्याची खबर पालिका आरोग्य विभागास लागताच त्याच दिवशी या इसमास भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते. दुसरा रुग्ण शहरातील आझमी नगर येथे राहणारे ३८ वर्षीय इसम त्यांच्या आईच्या उपचारासाठी मुंबई येथील जे जे हॉस्पिटलमध्ये होते, ते घरी परतल्या नंतर त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले होते तर तिसरा रुग्ण कामतघर भाग्यनगर येथील २२ वर्षीय महिला असून ही महिला मुंबई गोवंडी येथे गेल्या होत्या, त्या भाग्यनगर कामतघर येथे आल्या असत्या त्यांनाही कॉरंटाइन करण्यात आले होते. शनिवारी या तीनही रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या घरच्यांना भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले असून हे तीनही रुग्ण राहत असलेला परिसर पालिकेने सील केला असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांनी दिली आहे. या तीन नव्या रुग्णांमुळे भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १६ वर पोहचला असून ग्रामीण भागात १० रुग्णांची नोंद आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील भिवंडीतील एकूण रुग्णांची संख्या आता २६ वर पोहचली आहे.