भिवंडीतील कोरोनाबाधितांची संख्या १५ वर

भिवंडी: भिवंडीतील कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत आता दिवसागणिक वाढ होत असून शहर व ग्रामीण भागातील एकूण रुग्ण संख्या १५वर पोहोचली आहे. बुधवारी सायंकाळी उशिराने ग्रामीण भागातील कोनगाव येथील एका ४६

भिवंडी: भिवंडीतील कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत आता दिवसागणिक वाढ होत असून शहर व ग्रामीण भागातील एकूण रुग्ण संख्या १५वर पोहोचली आहे. बुधवारी सायंकाळी उशिराने ग्रामीण भागातील कोनगाव येथील एका ४६ वर्षीय कॅन्सरग्रस्त महिलेचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर राहनाळ ग्राम पंचायत हद्दीतील येथील चरणीपाडा येथे एका ६२ वर्षीय महिलेस करोनाची लागण झाल्याचे उघड झाले असून हा रुग्ण महिला दमा विकारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना लॅबचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी या महिलेच्या घरातील ५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते, तर गुरुवारी या महिलेच्या संपर्कातील आणखी दहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या दोन्ही महिलांच्या पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे . 

आज कणेरी येथील ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोना झाल्याचे सष्ट झाले आहे. हा रुग्ण मधुमेहाच्या उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल झाला होतो , आता तो भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला असता या रुग्णाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७ वर पोहोचली आहेत. तर या व्यक्तिच्या घरच्यांना व त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येणार असून  हा कोरोनाबाधित रुग्ण ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होता तो दवाखाना व रुग्ण राहत असलेला परिसर देखील सील करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे. दरम्यान भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांच्या एकूण रुग्ण संख्या आता १५ वर पोहोचली आहे.