भिवंडीत आज आढळले ३ नवे कोरोना रुग्ण तर दोघांची कोरोनावर मात

भिवंडी: भिवंडी शहरात सोमवारी ३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यात समाधानाची बाब म्हणजे १७ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले २ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती

भिवंडी: भिवंडी शहरात सोमवारी ३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यात समाधानाची बाब म्हणजे १७ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले  २ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे .

भिवंडी शहरात मालेगाव येथून आलेले ५३ वर्षीय व मुंबई बांद्रा येथून आलेला २३ वर्षीय युवक उपचारानंतर कोरोना निगेटिव्ह होऊन रविवारी रात्री उशिरा घरी परतले असता सोमवारी आयुक्त डॉ .प्रवीण आष्टीकर, उपमहापौर इम्रान खान, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे, सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव , नगरसेवक अरुण राऊत ,अहमद सिद्दीकी ,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे यांनी उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांचे स्वागत केले .या प्रसंगी स्थानिक नागरिक, आरोग्य केंद्रातील परिचारिका यांनी टाळ्या वाजवून ,फुलांच्या पाकळ्या त्यांच्यावर टाकत त्यांचे स्वागत केले . या प्रसंगी ५३ वर्षीय रुग्णाने भिवंडीकर नागरिकांना कोरोना चा सामना करण्याची हिम्मत देण्यासाठी आपणास बरे करून पाठविले आहे. असे सांगितले. कोरोनाला घाबरून नव्हे तर धैर्याने तोंड देणें गरजेचे असून त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग , वेळोवेळी हात धुणे,सॅनिटायझरचा वापर करणे या साध्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे असून शासन,रुग्णालय, महानगर पालिका प्रशासनाने आमची चांगली काळजी घेतल्यानेच आम्ही लवकर बरे होऊ शकलो, अशी प्रतिक्रिया दिली आहे .

आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी कोरोनाबाबत माहिती देताना सांगितले की ,शहरात आजपर्यंत आढळलेले सर्वच्या सर्व १९ रुग्ण हे बाहेरून भिवंडी शहरात आले होते .त्यांचा संसर्ग इतरांना होण्या आधीच आपण कोरोना बधितांवर उपचार सुरू केल्याने शहरातील कोरोना बधितांचा आकडा वाढला नसून हे आरोग्य विभागाचे यश असल्याचे सांगत ,शहरातील सर्व क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून ज्या नागरीकांना ताप ,खोकला ,सर्दी असे आजार असतील त्यांची तपासणी शहरातील ५ फिव्हर क्लिनिकमध्ये करून संशयित रुग्ण आढळल्यास त्यास कोरंटाईन करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले .सोमवारी भिवंडी शहरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यामध्ये एक महिलेचा समावेश असून या तिघांनाही शहरा बाहेर याची लागण झाली असल्याचे सांगितले .
फुलेनगर येथील २६ वर्षीय महिला हद्दीबाहेरील हॉस्पिटलमध्ये काम करत असताना कोरोना ने बाधित झाली असून . भादवड येथील ५५ वर्षीय पुरुष शहरा बाहेरील रुग्णालयांमध्ये मणक्याच्या आजारावर उपचार घेत असताना बाधित झालेले आहेत.तर ब्रह्मानंद नगर ,कामत घर येथे राहणारी ३५ वर्षीय व्यक्ती ही  मुंबई येथील रुग्णालयात बहिणीच्या उपचारासाठी तिच्या सोबत गेले होते .तेथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांनी दिली आहे . शहरातील एकूण रुग्णांची संख्या १९ वर पोहचली असतानाच दोन रुग्ण उपचारा नंतर बरे होऊन घरी परातल्याने शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या १७ झाली असून शहरांमध्ये सुदैवाने आत्तापर्यंत  कोरोनामुळे एकही रुग्ण दगावला नाही असे शेवटी डॉ.जयवंत धुळे यांनी सांगितले .