भिवंडीमध्ये आज ३ रुग्णांची नोंद झाल्याने शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १३

भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच आज ग्रामीण भागातील काल्हेर येथे कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळले आहे. या तीन नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा

 भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच आज ग्रामीण भागातील काल्हेर येथे कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळले आहे. या तीन नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १३ वर पोहचला आहे. दरम्यान ग्रामीण भागातील पडघा बोरिवली येथील महिला कोरोनामुक्त झाली असून आता ग्रामीण भागातील १२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १९ वर पोहचला आहे. दरम्यान शहरातील २ रुग्ण बरे झाल्याने आता बाधित रुग्णांचा आकडा १७ झाला आहे. त्यामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा आता २९ वर पोहचला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.  ग्रामीण भागातील काल्हेर येथील ३९ वर्षीय व ५७ वर्षीय पुरुष हे दोघे जण मुंबई महापालिकेतील कर्मचारी आहेत तर एक रुग्ण ४५ वर्षीय पुरुष असून ते ठाणे महापालिकेत (टिएमसीत) कंडक्टर म्हणून कार्यरत असून बुधवारी त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्या घरच्यांना भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले असल्याची माहिती खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ डावकर यांनी दिली आहे.