bhivandi property seal

भिवंडी: कोरोना काळात आर्थिक परिस्थिती डबघाईची झालेल्या भिवंडी(bhivandi) महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली आहे.

भिवंडी: कोरोना काळात आर्थिक परिस्थिती डबघाईची झालेल्या भिवंडी(bhivandi) महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली आहे. उपायुक्त कर मारुती गायकवाड यांनी शहरातील प्रभाग समिती ४ अंतर्गत येणाऱ्या जुना गौरीपाडा येथील मालमत्ता क्रमांक ३६१ ,३६७ या यंत्रमाग कारखान्याचे मालमत्ता कर न भरल्याने त्यावर जप्ती कारवाई करीत कारखाना सील करण्यात आला आहे.  नारपोली – २ येथील मालमत्ता क्रमांक ११७७,१५०९,१३०० व १३०१ या यंत्रमाग कारखान्यां सह निवासी मालमत्ता क्रमांक १३५६ , १३८७ येथे तब्बल मालमत्ता कर थकबाकी पोटी १९ लाख ९१ हजार ५६१ रुपयांचे धनादेश वसूल केले आहेत.

उपायुक्त कर मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या या कारवाईत प्रभाग क्रमांक ४ च्या सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे ,करमूल्यांकन विभागाचे कार्यालय अधीक्षक बाळाराम जाधव ,सहाय्यक कर मूल्यांकन अधिकारी गिरीष घोष्टेकर ,सायरा अन्सारी या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला .एकूणच महानगरपालिका प्रशासना कडून व्याज माफीची अभय योजना सुरू केली असतानाच थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरू केल्याने कोरोना मुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या मालमत्ता धारककांच्या चिंतेत वाढ झाली आहे .